सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी निघालेल्या बँक कर्मचा यांच्या डोळ्यात तिखट टाकून २३लाखाची लूट
सिंधुदुर्गातील वैभववाडी येथे एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी निघालेल्या बँक कर्मचा यांच्या डोळ्यात तिखट टाकून २३लाखलुटण्याचा प्रकार घडला आहे
अज्ञात चोरट्याने २३लाख रुपयाची रक्कम लुटून पोबारा केला आहे. ही घटना तरेळे – वैभववाडी मार्गावर घडली आहे.घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बँक ऑफ इंडिया शाखा वैभववाडीच्या एटीएम मध्ये कॅश डिपॉझिट करणारे सेक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे कर्मचारी विठ्ठल खरात, संदेश कारीवडेकर हे मोटरसायकल वरून २३ लाख रुपये घेऊन कणकवलीहुन वैभववाडी च्या दिशेने निघाले होते.
कणकवलीच्या बँक ऑफ इंडियामधून ३० लाखाची रोकड खरात व कारीवडेकर यांनी घेतली व त्यातील ७ लाख रुपये कणकवलीच्या बँक ऑफ इंडिया च्या एटीएम मध्ये डिपॉझिट केले. त्यानंतर उर्वरीत २३ लाख रुपये वैभववाडी येथील एटीएम मध्ये भरणा करण्यासाठी मोटरसायकलने जात होते. कोकीसरे घंगाळेवाडी दरम्यान मागून मोटरसायकलने आलेल्या तिघांनी खरात व कारीवडेकर यांच्या मोटारसायकलवर लाथ मारली. तसेच दोघांच्याही डोळ्यांत मिरची पावडर मारली आणि त्यांच्या ताब्यातील रोख २३ लाख रुपये घेऊन तळेरे च्या दिशेने पोबारा केला. हा प्रकार काल दुपारी घडला आहे.याबाबत पोलिस आरोपींच्या शोधात आहेत
www.konkantoday.com