एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळणार
परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.याबाबतचा शासन निर्णय (GR) काल जारी करण्यात आला. त्यामुळे एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार आहे. लवकरच कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन देण्यात येईल, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.
www.konkantoday.com