
एच आय व्ही बाधित संस्थेला महिलाकाँग्रेस करणार मदत
रत्नागिरी -*एच आय व्हीं बाधित झालेल्या रुग्नाना समाजात चांगली वागणूक मिळत नाही.त्यांना कुटुंबातून दूर केले जाते . त्यांना कोणतीही आर्थिक ,मानसिक ,सामाजिक मदत मिळत नाही. अशा बाधित रुग्णासाठी खेडशी येथे आशीर्वाद संस्था ही आधार देते.परंतु तिथे सुद्धा त्यांना संस्थेला पाहिजे तशी मदत मिळण्यास काही अडचणी आहेत असे महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांना कळले.त्यासाठी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी भेट घेतली असता तेथील दूर केल्या गेलेल्या या निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन मिळत नाही आहे. रेशन कार्ड मिळत नाही आहे. तसेच आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना कोव्हीड लस मिळत नाही. अश्या गंभीर प्रश्नांवर तेथील व्यवस्थापक डिसोजा मॅडम यांच्याबरोबर चर्चा झाली. त्यासाठी संबंधित अधिकारीना पत्र देऊन त्यांना लस मिळवून देण्यासाठी महिला काँग्रेस ठोस पाऊल उचलले जाईल असे आश्वासन महिला काँग्रेस ने दिले व तेथील निराधार महिलांना भेटवस्तू दिल्या.तदप्रसंगी महिला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत महिला जिल्हाध्यक्ष ॲड आश्विनी आगाशे ,अनुया बाम आणि मीडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे उपस्थित होत्या
www.konkantoday.com