लोटे औद्योगिक क्षेत्रात वायू प्रदूषण, खा. सुनिल तटकरे यांनी घेतली दखल,लवकरच अधिकार्यांची बैठक बोलावणार
दाट धुक्याप्रमाणे आपल्याला दिसत असलेले दृश्य कोणत्या थंड हवेच्या ठिकाणचे नसून तालुक्यातील लोटे औद्योगिक परिसरातील आहे. हे धुके किंवा ढग नसून हा लोटे औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात आलेला विषारी धूर आि गॅस आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून या परिसरात डोळ्यांची जळजळ आणि उग्र वास येत असून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण झाल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहने चालवणे देखील जिकिरीचे झाले आहे. याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव खासदार सुनिल तटके यांनीही घेतला असून लवकरच ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांची बैठक बोलावणार आहेत. www.konkantoday.com