
मालदीव येथे येथे झालेल्या दिव्यांगांच्या स्पर्धेत खेडच्या प्रशांत महेंद्र सावंत याने गोल्ड व सिल्व्हर पदक मिळविले
रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र असलेले व खेड चे रहिवासी प्रशांत महेंद्र सावंत यांनी दिनांक २२ते २५ सप्टेंबर २०२१ मालदीव मध्ये झालेल्या दिव्यांग खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत गोळा फेक प्रकारात गोल्ड मेडल,थाळीफेक प्रकारात सिल्व्हर मेडल मिळवले.
त्या बद्दल खेडचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री.वैभवजी खेडेकर तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com