मत्स्य महाविद्यालय, शिरगांव रत्नागिरी आणि राष्ट्रीय मास्तिकी विकास मंडळ, हैद्राबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ निर्मिती एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय मास्तिकी विकास मंडळ व मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी येथील कार्यरत असलेले मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत मुल्यवर्धीत मत्स्य पदार्थ निर्मिती या विषयावर दि. २२.०८.२०२१ रोजी तवसाळ, ता. गुहागर येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या एकदिवसीय कार्यक्रमाचे उदघाटन कांदळवन समिती अध्यक्ष, तवसाळ निलेश सुर्वे, उपजिविका तज्ञ वैभव बोंबले, कांदळवन प्रकल्प समन्वयक चिन्मय दामले, रोहीत बिर्जे, व प्रणव बांदकर आणि मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आशिष मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एकूण २५ लाभार्थी उपस्थित होत. या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉ. अजय देसाई, विभाग प्रमुख डॉ. आशिष मोहिते, आणि डॉ. दबीर पठाण यांनी अनुक्रमिे मासळीचे आहारातील महत्व (पोषण महा), यासाठी लागणारा परवाना लेबलिंग आणि पॅकेजिंग, मुल्यवर्धीत पदार्थांचे बाजारातील विक्री या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
दुपारनंतरच्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक श्रीकांत शारंगधर व विनायक विश्वासराव यांनी विविध मुल्यवर्धीत पदार्थ जसे, कोळंबी आणि कालवे लोणचे, मत्स्यवडा, मत्स्य शेव आणि जवला चटणी इ. पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. संजय सावंत व विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे आणि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिंगारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. जे. एम. कोळी, साईप्रसाद सावंत आणि श्री. तळेकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाशेवटी सर्व लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मुल्यवर्धीत पुस्तिकाचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी निलेश सुर्वे, कांदळवन प्रतिष्ठान समिती अध्यक्ष, तवसाळ यांनी आभार प्रदर्शन केले.
www.konkantoday.com