
गणपतीपुळे येथे मदत ग्रुप (आपत्कालीन टिम) च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.
दिनांक 27/09/2021 रोजी या रक्तदान शिबीराचे श्री चंडिका देवी मंदिराच्या सभागृहात आयोजण करण्यात आले होते. गणपतीपुळे गावचे सरपंच कलपना पकये, उपस्थित मान्यवर व गावचे खोत श्री भिडे यांनी देवीला प्रार्थना करुन शिबीरास सुरुवात केली.
शिबीरासाठी शासकीय रुग्णालय रक्तपेढीची मदत झाली.
या शिबिरात मदत ग्रुपच्या हाकेला साथ देत सुमारे 76 दात्यांनी रक्तदान केले. मदत ग्रुप हा गणपतीपुळे पंचक्रोशीतील ग्रुप असुन आपत्कालीन परीस्थितीत सर्वांना शक्य असेल ती मदत करत असतो. आभार मानतेवेळी ग्रुपचे प्रतिनीधी व ग्रा. सदस्य श्री राज देवरुखकर यांनी सर्व मान्यवर, रक्तदाते, मदतकर्ते, कार्यकर्ते, रक्तपेढी टिम, जयगड पोलिस स्टेशन आणी चंडिका मंदिर ट्रस्टचे आभार मानले. ग्रुप तर्फे असे सामाजिक कार्यक्रम हाती घ्यायचे व ते पूर्णत्वास न्यायचे असा मानस बोलुन दाखविला. पंचक्रोशीतील लोकांच्या उत्तम प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी झाला अनेक मान्यवरांनी मदत ग्रुपच्या सामाजिक कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या….