
काही महिन्यांपूर्वी पेव्हर ब्लॉक करून सुंदर बनविलेल्या मारुती मंदिर परिसरात गटाराचे खोदकाम सुरू ,नगरपरिषदेच्या कारभारात नियोजनाचा अभाव
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर स्टेडियम नजीक असलेल्या व्यापारी गाळ्यांच्या समोरील परिसर रत्नागिरी नगरपरिषदेने काही महिन्यांपूर्वीच पेव्हर ब्लॉक लावून स्वच्छ व सुंदर बनविला होता याठिकाणी असलेल्या कंपाऊंड परिसराला स्टीलचे खांब उभे करून त्याठिकाणी आतमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे हा परिसर आकर्षक दिसत असतानाच आज नगरपरिषदेने गटाराच्या कामासाठी घातलेले पेव्हर ब्लाॅक उखडून पुन्हा गटाराचे काम सुरू केले आहे गटारासाठी आता चर पाडण्यात आला असून घातलेले पेव्हर ब्लॉक उखडण्यात आले आहेत या भागाचे पेव्हर ब्लॉक घालून सौंदर्यीकरण करण्यात आले होते त्यावेळी नगरपरिषदेला या ठिकाणाहून गटार न्यायचे आहे याचे नियोजन माहिती नव्हते का असा प्रश्न उपस्थित होत आहे जर या ठिकाणाहून गटार न्यायचे होते तर आधी गटाराचे काम करून त्यानंतर त्यावर पेव्हर ब्लॉक करणे आवश्यक असतानादेखील आधी पेव्हर ब्लॉकचे काम करून आता परत गटारासाठी झालेले काम उखडून टाकण्यात येत आहे त्यामुळे नगरपरिषदेच्या चाललेल्या कामावर कोणाचेच नियंत्रण नाही का ?असा सवाल उपस्थित होत आहे नगरपरिषदेच्या अशा नियोजना अभावी कामांमुळे जनतेचा पैसा वाया जात असल्यामुळे जनतेतही संताप व्यक्त होत आहे
www.konkantoday.com