
रेल्वे प्रवासी संघटनांची सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी
ठाकरे सरकारनं शाळा ४ ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळं ७ ऑक्टोबर तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहं २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. राज्य सरकार आता सर्व गोष्टी सुरु करण्यास परवानगी देत आहे.यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.
www.konkantoday.com