सावर्डे , चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचा सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के याने जिल्ह्यातून यूपीएससी परीक्षेत यश मिळविले

सावर्डे ,चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचा सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांनी दिल्ली येथे झालेल्या २०२० च्या UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे .प्रथमेश हा All india rank २३६ क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यापूर्वी चिपळूणच्या अश्विनी जोशी या यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी झाल्या होत्या .त्यानंतर आता यूपीएससी परीक्षेत रत्नागिरी जिह्यातून ऊ्ज्जवल यश मिळवण्याचा मान प्रथमेश याने मिळविला आहे .
प्रथमेश अरविद राजेशिर्के यांचे 10 पर्यंतचे शिक्षण एस व्ही जे सी टी डेरवण येथील इंग्रजी माध्यमिक शाळेत झाले तर एस एस सी नंतर रत्नागिरी शासकीय पॉलिटेक्निक मध्ये डिप्लोमा पूर्ण करून पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण सांगली येथील वालचंद महाविद्यालयात पूर्ण केले त्यानंतर प्रतिष्ठेच्या इंजिनिअर पदावर प्रतिथयश कंपनीत नोकरी केली. पण आयएएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगले असल्यामुळे ती नोकरी सोडून आयएस साठी आवश्यक असणारा अभ्यास केला. 2018 साली पुणे व 2019 ते 2020 मध्ये UPSC अभ्यास दिल्ली येथे पूर्ण करत
IAS अधिकारी स्वप्न उराशी बाळगत त्यांनी हे ध्येय गाठले.
कै. अरविद राजेशिर्के व आई शर्मिला राजेशिर्के याचा सुपुत्र असून वडीलाचे गत वर्षा पूर्वी कोव्हिडं मुळे निधन झाले वडील सैनिक म्हूणन निवृत्त झाले होते.
मांडकी गावचे माजी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश राजेशिर्के याचा प्रथेश हा भाऊ असून प्रथमेश याने खूप परिश्रम करून मिळवलेल्या यशा बदल राजेशिर्के परिवार यांनी खूप समाधान व्यक्त केले आहे .
चिपळूण विधानसभा आमदार शेखर निकम
व डेरवण शाळेतील मुख्यध्यापक सौ शरयू यशवंतराव ,उधोजक सचिन पाकळे, केतन पवार , नायशी उपसरपंच संदीप घाग,अमित सुर्वे यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे , शेखर निकम युवा मंच सावर्डे, सुभाष पाकळे प्रतिष्ठानआदी शिक्षण प्रेमी व पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button