खाजगी सावकारा प्रमाणेच महावितरणचा वीज ग्राहकांना वीज बिल वसुलीसाठी तगादा
कोराेनाच्या महामारी नंतर अडचणीत असलेल्या वीज ग्राहकांना आता महावितरणने बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे मात्र ज्याप्रमाणे खाजगी सावकारांकडून पैसे वसुलीसाठी जसा तगादा लावण्यात येतो त्याचप्रमाणे वीज मंडळाच्या कर्मचार्यांकडून त्याच पध्दतीने तगादा लावण्यात येत आहे
विशेष म्हणजे बिले भरण्याची मुदत असतानादेखील वीजमंडळाच्या कर्मचार्यांकडून वारंवार फोन करून ग्राहकांना नाहक त्रास देण्याचा प्रकाररत्नागिरी शहरात घडला आहे
कराेनाच्या काळात राज्यकर्त्यांनी राज्यातील वीजग्राहकांना सवलतीची आश्वासन दिली होती मात्र त्यानंतर सोयीस्करपणे त्यात बदल करून विजेची सर्व बिले ग्राहकांकडून वसूल करण्याचे आदेश दिले होते महावितरणकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढल्याने महावितरणने गणपती उत्सवानंतर मोठ्या प्रमाणावर सक्तीने वसुली सुरू केली आहे रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या असल्याने राज्यात इतर ठिकाणी नियम शिथिल झालेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र गणपती उत्सवाच्या आधीपर्यंत कडक नियमाची अंमलबजावणी केली हाेती त्यामुळे दोन महिने दुकाने बंद ठेवावी लागल्याने व्यापारी व वीज ग्राहक आर्थिक कोंडीत सापडला होता त्यानंतर वीज महावितरणने ग्राहकांच्या थकीत बिल वसुलीसाठी मोहीम सुरू केली असून थकीत बिल धारकांची वीज कनेक्शन तोडण्याचे धोरण अवलंबिले जात आहे ज्याप्रमाणे खासगी सावकार ग्राहकांकडून पैशाच्या वसुलीसाठी सतत फोनवर तगादा लावतात त्याचप्रमाणे आता वीज ग्राहकांना महावितरणकडून फोन येत आहेत रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील एका ग्राहकाला आलेल्या बिलाची मुदत सत्तावीस सप्टेंबर पर्यंत असतानादेखील महावितरण कार्यालयातील मेस्त्री नामक व्यक्तीने ग्राहकाला आदल्या दिवशी व लगेच तातडीने दुसर्या दिवशी परत फोन करून वीजबिले भरण्यासाठी तगादा लावला वास्तविक बिल भरण्याची मुदत संपलेली नसतानादेखील महावितरण कर्मचार्यांकडून बिलांच्या वसुलीसाठी असा तगादा लावणे किती योग्य आहे एक तर महावितरणने नेमलेल्या कंत्राटदाराकडून ग्राहकांना ७दिवस आधी बिल मिळणे नियमात आहे मात्र वीजग्राहकाला वेळेवर बिले मिळत नाहीत मात्र त्याचे खापर ग्राहकांवर फोडले जाते तसेच वीज भरण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत त्यांच्यात व महावितरण त्यांच्यात समन्वय नसल्याने अनेकदा ग्राहकाने वीजबिले भरूनदेखील ते पुढील बिलात येणे म्हणून दाखविली जातात त्यामुळे ग्राहकांना परत महावितरणच्या कार्यालयात जाऊन बिल भरल्याचा पुरावा दाखवून बिले कमी करून घ्यावे लागतात जर सगळंच ग्राहक करणार असाल तर महावितरणचे कर्मचारी काय काम करतात हा प्रश्न आहे सगळा दोष वीज ग्राहकांच्या माथी मारण्यापेक्षा पगार घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी व महावितरणने आधी आपला कारभार सुधारावा अशी ग्राहकांची मागणी आहे
www.konkantoday.com