सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनकडून मिळालेली मान्यता अवघ्या ४८ तासांच्या आत अचानक रद्द?

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनकडून मिळालेली मान्यता अवघ्या ४८ तासांच्या आत अचानक रद्द करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . प्रस्तावात त्रुटी काढून त्याच्या पूर्ततेसाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली. आधी मंजूर झालेल्या प्रस्तावात नंतर कशा त्रुटी निर्माण झाल्या, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गातील जनरेटा उभारल्यावर मंजूर झालेल्या या महाविद्यालयाचे भवितव्य पुन्हा अधांतरी झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर राज्यातील अन्य तीन मेडिकल कॉलेजला परवानगी दिली होती. परंतु सिंधुदुर्गला मिळाली नव्हती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button