कोरोना काळात जीवाची बाजी लावणार्या जिल्ह्यातील ८३ वैद्यकीय अधिकार्याकडे शासनाचे आता दुर्लक्ष
कोरोना काळात जीवाची बाजी लावणार्या जिल्ह्यातील ८३ सदर्थ वैद्यकीय अधिकार् यांकडे शासनाचे आता दुर्लक्ष होत आहे . एमबीबीएस डॉक्टर मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या वैद्यकीय अधिकार्यांना काम थांबविण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून दिले जात आहेत. गेले तीन महिने हे कोरोना योद्धा पगारापासून वंचित आहेत. सेवा बजावताना कोरोना झालेल्या डॉक्टरांच्या रजेच्या कालावधीमध्ये पगार कापण्यात आला. हे कोरोना योद्धा सदर्थ वैद्यकीय अधिकारी वार्यावर असून त्यांच्या सेवेवर कधीही गंडांतर येण्याची शक्यता आहे.
अजूनही नियुक्तीच्या ठिकाणी हे वैद्यकीय अधिकारी काम करीत आहेत. मात्र ३ महिने झाले तरी त्यांना पगार देण्यात आलेला नाही. एकूणच महामारीच्या काळात काम करणार्या या योद्ध्यांची शासनाकडून गळचेपी सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत लवकरच हे वैद्यकीय अधिकारी मंत्री किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांना निवेदन देणार आहेत.
www.konkantoday.com