उपोषणाची आज दखल न घेतल्यास उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार:-रमजान गोलंदाज
सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांनी राष्ट्रीय महामार्ग वरील पडलेले खड्डे भरण्यासाठी निवेदन देऊन ८ दिवसाची मुदत दिली होती. मात्र संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही त्याच्या विरोधात रमजान गोलंदाज व त्यांचे सहकारी यांनी काल पासून आमरण उपोषणास सुरवात केली असून दोन दिवस झाले तरी दखल घेतली नसल्याने जर आज दखल घेतली नाही तर उद्या पासून राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे रमजान गोलंदाज यांनी आज जाहीर केले.
राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना लेखी पत्र देऊन सुद्धा दखल घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करत निषेध केला आहे. सद्या खड्डे महामार्ग वर गाडी चालवणे कठीण झाले असून प्रशासनतील काही निगरगठ्ठ अधिकारी मुळे विकासाला अडचणी निर्माण झाल्या असून कोणत्याच लोकप्रतिनिधीची प्रशासनावर वचक राहिलेली नाही.गेली २ दिवस आमरण उपोषण सुरु असून मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यालयातून उपोषणची दखल घेतली गेली मात्र संबंधित विभागाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे आता वातावरण तापले आहे आज दखल घेतली नाही तर उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे रमजान गोलंदाज यांनी जाहीर केले आहे
www.konkantoday.com