
आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिना लागणार
कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा आंबा घाट अवजड वाहतुकीला अजूनही धोकादायक आहे.त्यामुळे या मार्गावर अजून अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून रेटींग वॉल (संरक्षक भिंत) बांधण्यात येणार आहे. सुमारे साडेचार कोटीचे हे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिना लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी दिली
www.konkantoday.com