व्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
व्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नृत्याने सजलेलं नवीन गाणं पैंजण तुझं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.दि.२४ सप्टेंबर 2021 रोजी PBA Music चा यूट्यूब चैनल वर हे गाणं प्रसिद्ध होणार आहे.
यामध्ये नृत्याविष्कार साकारणाऱ्या सलोनी विलास सातपुते या पुण्यातील असून त्या बीइआयटी पदवी घेत आहे. सातपुते या व्यवसायिक नर्तक असून दहावीनंतर या क्षेत्रात त्यांनी आपलं करियर सुरू केलं. नृत्य बरोबर त्यांनी अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात सुध्दा आपलं करिअर सुरू केलं. त्यांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे व २०१८ ला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उल्लेखनीय काम केलं आहे. इंडस्ट्री मधली त्यांची खरी सुरुवात झाली २०२० ला त्यांचं व्हायरल झालेल्या डान्स व्हिडिओ नंतर. हा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता व लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची ओळख इंडस्ट्रीमधील दिग्गजांन पर्यंत पोहचली आणि सर्वत्र त्या वायरल गर्ल म्हणून प्रसिद्ध झाल्या.
सातपुते यांनी झी मराठी वरील महाराष्ट्राचा सुपर स्टार, स्टार प्रवाह वरील साता जन्माच्या गाठी या मालिकांमध्ये सहभाग घेतला होता.
तसेच हरी ओम व गिरदाब या अपकमिंग चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. सातपुते यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. मॉडेलिंगमध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग व मॉडेलिंग शूट केले आहेत.
या वर्षाऋतूमध्ये प्रेमाची साद घालण्यासाठी PBA Music तुमच्यासाठी घेऊन येत आहे,
पैंजण तुझं…
मुकुंद राऊत यांच्या दिग्दर्शिय पदार्पणातील, DID फेम दीपक हुलूसरे आणि व्हायरल गर्ल अभिनेत्री सलोनी सातपुते यांच्या नुर्त्याने सजलेले हे गाणे, या गाण्याची गीतरचना अक्षय जोशी यांची असून, प्रेम धीराळ यांच्या मधुर आवाजाततील हे गीत अभि-राम यांच्या जोडीने संगीतबद्ध केले आहे.
प्रेक्षांच्या भेटीला दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी PBA Music च्या YouTube channel वर येत आहे.