
कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करताना नियम पाळले नाहीत ,राजापुरात गुन्हा दाखल
प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करू अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र सफेद कपड्यामध्ये बांधून दिलेला मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधी करण्याचा प्रकार शहरातील कोंढेतड येथे उघड झाला आहे. या एकूणच प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली
दरम्यान प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेताना संबंधितांविरोधात पोलीस स्थानकात तकार दाखल केली आहे. राजापूर नगरपरिषदेचे मुख्यलिपीक जितेंद्र जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी फकीर जाफर हवालदार यांच्यासह अन्य सात जणांविरोधात साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
www.konkanyoday.com