
भाट्ये बीचवर राबविण्यात आलेल्या उपक्रमात दीड टन कचरा गोळा
भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीतर्फे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून भाट्ये बीचवर राबविण्यात आलेल्या उपक्रमात दीड टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टीकच्या बाटल्या, टीन, जाळी, दोरखंड, खाद्यपदार्थांचे रॅपरचा समावेश होता. पर्यावरण संवर्धनाची बीजे पेरणे आणि समुद्रकिनार्यांवर पर्यावरणाचे संतुलन राखणे हा उद्देश ठेवून कार्यक्रमाचे नियोजन केले.
www.konkantoday.com