
चिपळूणचे सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करू, ना. उदय सामंत यांची ग्वाही
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची पुरामुळे दुरवस्था झाली आहे. याची पाहणी आपण केली आहे. सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभे करण्यासाठी आवश्यक निधीबाबत आपण बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निधी मिळवू, त्यातून पुन्हा सांस्कृतिक केंद्र उभे करू असे उच्च व तंत्र शिक्षणमत्री ना. उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान चिपळूणचे माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी यांनीदेखील सांस्कृतिक केंद्राकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला आहे
महापुरात सांस्कृतिक केंद्र पाण्याखाली गेले. आता दीड महिना झाला. परंतु साधी केंद्राची साफसफाईही करण्यात आलेली नाही. नगराध्यक्षा, प्रशासन कुणीही लक्ष देत नसल्याने नाट्यप्रेमींमध्ये कमालीचा संताप आहे. दीड महिन्यात साफसफाई झाली नसल्याने आता त्यातील वस्तू सडल्या असतील. परंतु साधा दीड महिन्यानंतर केंद्राचा दरवाजाही उघडला नसल्याने माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. www.konkantoday.com