
लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सचे व्यवस्थापकीय संचालक व उद्योजक सतीश वाघ यांनी घेतले वन्यप्राणी दत्तक
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे एका वर्षासाठी वन्यप्राणी दत्तक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत सहभागी लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योजक सतीश वाघ यांनी तेथील वाघ आणि सिंह यांचे वर्षभरासाठी पालकत्व स्वीकारले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्यावतीने वर्षभरासाठीची ही योजना ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेला आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सध्या प्राण्यांच्या संख्येपेक्षा इच्छुक प्राणी पालकांची संख्या अधिक असल्याचे पुढे आले आहे. www.konkantoday.com