लोकप्रतिनिधींची वर्षानुवर्षे आश्वासने आजही स्त्याची सोय नसल्याने राजापूर तालुक्यातील ताम्हणे धनगरवाडीतील नागरीकांना रूग्णांना डोलीतून आणावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून प्रसिध्द आहे.परंतू याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खो-यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
राजापूर तालुक्यातील ताम्हणे धनगरवाडीवर रस्त्याची सोय नसल्याने तेथील आजारी रूग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी डोलीतून आणावे लागत आहे.ताम्हणे धनगरवाडीतील जेष्ठ नागरीक नाना धोंडू अचिर्णेकर दिनांक १०/९/२०२१ रोजी अचानक आजारी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी वाडीतील नागरीकांनी डोलीतून आणले आहे.रस्ता नसल्याने अनेक वेळा वाडीतील आजारी रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत असल्याने यापुर्वी अनेक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सरकार असे किती नागरीकांचे बळी घेणार अशी संतप्त भावना स्थानिक नागरीकांची आहे.
राजापूर तालुक्यातील आमदार मा.राजनजी साळवी प्रत्येक निवडणुकीत ताम्हणे धनगरवाडीतील नागरीकांना रस्ता करून देण्याचे जाहीर वचन दिलेआहेत.सलग ४ टर्म आमदार असुनही त्यांनी रस्त्याचे वचन पुर्ण केले नाही.लोकप्रतिनिधी निवडणुक संपली की विसरून जातात अशी परीस्थिती मागील २० वर्ष सुरू आहे. आता जनतेलाच लोकप्रतिनिधींना विसरण्याची वेळ आली आहे अश्या भावना राजापूर विधानसभा मतदारसंघात उमटू लागल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील ताम्हणे धनगरवाडीचा प्रश्न लवकरच मा.आमदार राजनजी साळवी यांनी मार्गी न लावल्यास महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच,रत्नागिरी या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाखाली मा.आमदार राजनजी साळवी यांच्या निवास्थानासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिला आहे.
www.konkantoday.com