
रत्नागिरी येथे जनआशीर्वाद यात्रेवेळी झालेली चोरी शहर पोलिसांकडून उघडकीस, सात जणांच्या टोळीला अटक आणि मुद्देमालही जप्त
दि. २७.०८.२०२१ रोजी मा. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीमध्ये मारूती मंदिर सर्कल, रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमावेळी गर्दीचा फायदा घेवून अनोळखी आरोपींनी हातचलाखीने तब्बल ४ सोन्याच्या चेन व पाकिटमारी करून रोख रक्कम रु. ६,८००/- अशी एकूण २,४१,८००/- च्या मुद्देमालाची चोरी केली होती.
सदरबाबत गंभीर दखल घेत तात्काळ ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री. मोहितकुमार गर्ग, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी व मा. पोलीस निरीक्षक विनित चौधरी, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिसांनी गोपनीय बातमीदारांमार्फत प्राप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे एक एक दुवा जोडत बीड येथे जावून या गुन्ह्याचा तपास करून तिथून ७ आरोपींच्या टोळीला ताब्यात घेतले व त्यांच्याकडून चोरीतील ०३ सोन्याच्या चेन व रोख रक्कम रुपये ६,८०० तसेच गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली स्विफ्ट डिझायर मोटारकार व आरोपींचे ५ मोबाईल असा एकूण ४,३८,३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती जयश्री देसाई, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनित चौधरी, मा. पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. एम. एस. भोसले, पो.उ.नि. डी. वाय. चव्हाण, पो. हवा. ६१५/घोसाळे, पो. ना. २६५/ नार्वेकर, पो. ना. १३९९/ भोसले, पो. ना. १२४०/घोरपडे, पो. ना./३०० सावंत, पो. ना. १११२/भालेकर, पो. ना. १५०५/शिवलकर, पो. ना. ३१६/मोहिते, पो.ना. ४२८/कांबळे, पो. शि. ३९९/माने रत्नागिरी शहर पो. ठाणे, पो. हवा. ९०९/ आंबेकर व पो. ना. ४४४/शेख (स्था.गु.अ.शा. रत्नागिरी) तसेच पेठबीड पोलीस ठाणे, जि. बीड येथील पो. हवा. ५४९/ वाहूळ, पो. ना. १५००/मोमीन, पो. ना. १५०७/क्षीरसागर, पो. शि. १३८३/कांबळे, म.पो. शि. २२३७/पवार व म. पो. शि. १३०४/माने यांनी केली.
www.konkantoday.com