
मुंबई गोवा महामार्गावर खवटी येथे उभ्या असलेल्या बसवर तवेरा गाडीआदळली ,नऊ जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील खवटी गावाजवळ हाॅटेल सुरूच जवळ एस टी बस मधून आवाज येऊ लागला म्हणून गुहागर ते भांडूप ही बस बिघाड पाहण्यासाठी थांबविली होती रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एस टी बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणा-या तवेरा कारवरच्या चालकाचे आपल्या ताब्यातील कारवरचा ताबा सुटल्याने बसला पाठीमागून उजव्या बाजूला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील राखी सुशील कदम, , विहान सुशील कदम, सुशील सुरेश कदम, सुरेश नारायण कदम, सुश्मा सुरेश कदम सर्व रा पालघर ,महेश औदुंबर पवार, रश्मी राजेश दळवी, राजेश दळवी, कृष्णा राजेश दुवे रा. नालासोपारा यांना दुखापती झाल्या. जखमींना कळबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.
या अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तवेरा कार चालक सुहास सुरेश कदम वय 31 रा अंबरनाथ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
www.konkantoday.com