
दापोलीमध्ये पर्यटनासह मासेमारी हंगाम यावेळी तोट्यात
दापोलीमध्ये पर्यटन व मासेमारीचा या वेळचा चा हंगाम तोट्यात गेल्याचे चित्र व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. मे महिना किमान चांगला जाईल अशी अपेक्षा असताना मान्सूनपूर्व पावसाने या अपेक्षांवरही पाणी फेरल्याने येथील व्यावसायिकांवर हातावर हात ठेऊन बसण्याची वेळ आली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह मच्छीमारांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.मासेमारी, पर्यटनाच्या मुख्य हंगामाच्या कालावधीत अर्थात मे महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा पर्यटन व्यवसाय व मच्छीमारांसाठी मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरला, मे महिना अर्धा संपत नाही तोवर पावसाने जोरदार सुरूवात केली. यामुळे अनेक पर्यटकांनी हॉटेल रूम बुकिंग देखील रद्द केले तालुक्यात पर्यटन व मच्छीमारी व्यवसाळाची कोटीची उलाढाल घोक्यात आल्याचे हॉटेल व्यावसायिक व मच्छिमारांनी सांगितले.www.konkantoday.com