मुंबई-गोवा महामार्गावर १८ सप्टेंबरपासून पहिले आलिशान क्रूझ, रत्नागिरी जिल्ह्यात थांबा नाही
मुंबई-गोवा -मुंबई जलमार्गावर १८ सप्टेंबरपासून क्रुझ सेवा सुरू करण्यात येणार आहे. देशातील हे पहिले लक्झरियस क्रूझ असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती ऍड. विलास पाटणे यांनी दिली.
सिंगापूर, दुबई, हॉंगकॉंग, करेबियन आदी देशात क्रूझला महत्व आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनात क्षेत्रात भारताचा वाटा जेमतेम अर्धा टक्का आहे. देशातील ११ मोठ्या बंदरांपैकी मुंबई, गोवा, कोचीन, चेन्नई, न्यू मंगलोर या बंदरांचीच क्षमता आहे. साधारण भारतात १५८ क्रूझ पर्यटन क्षेत्रात आहेत. ही संख्या ७०० पर्यंत वाढली तर २.५ लाख रोजगार वाढून पर्यटन क्षेत्रात क्रांती होईल. त्यासाठी पर्यटकांचे आदराने स्वागत करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी हा महत्वाचा मुद्दा आहे. मुंबई बंदरात ३०० कोटी खर्चाचे ४.१५ एकरात क्रूझ टर्मिनल उभे राहिले आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) आंतराष्ट्रीय क्रूझ सेवा देणार्या कोंडेलिया क्रुझ या खासगी कंपनीशी करार केला आहे.
मुंबईपासून गोवा, कोची, दीव, लक्षद्वीप आणि श्रीलंका अशा चार ठिकाणी पर्यटक क्रुझ सेवा येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. जलवाहतुकीद्वारे पर्यटक सेवेत कार्यरत असलेल्या कोंडेलिया क्रुझ कंपनीशी आयआरसीटीसीने करार केल्याने अनेक पर्यटकांना उच्च दर्जाचा जलवाहतुकीचा अनुभव घेता येणार आहे. सध्या मुंबई-दीव- मुंबई, अँटसी-मुंबई, मुंबई-गोवा, मुंबई, कोची-लक्षद्वीप अशा मार्गावर हे जहाज जाणार आहे. यामुळे पर्यटकांना रेस्टॉरंट, खुले थिएटर, बार थिएटर, व्यायामशाळा, मुलांसाठी तलाव अशा सुविधा असणार आहेत. पहिल्या टप्प्यात या कंपनीची पहिली सेवा मुंबईमध्ये सुरू होत आहे. देशी पर्यटकांसाठी ती असणार आहे. www.konkantoday.com