गुहागर तालुक्यात वन्य प्राण्यांचे शिकार करण्याचे प्रमाण वाढू लागले
गुहागर तालुक्यात वन्य प्राण्यांचे शिकार करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. नुकतेच गुहागर तालुक्यातील धोपावे येथे जिवंत खवले मांजर पकडण्याची घटना घडली असून मुंढर येथे महिन्याभरापूर्वी वाघनखांची तस्करी उघडकीस आल्याने यावर संबंधित विभागाने वचक ठेवण्याची गरज आहे.
गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी जंगले बेसुमार आहेत. त्यामानाने या जंगलांची तोडसुद्धा सुरू आहे. ग्रामस्थांनी रानातील शेती बंद केल्यामुळे वन्य जीवांचा ओढा आता वस्तीत वाढू लागला आहे. त्यामुळे या प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. www.konkantoday.com