
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे.नारायण राणे हे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून ते अलिबागच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.
www.konkantoday.com