
रत्नागिरी शहरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी भाज्यांची आवक
रत्नागिरी शहरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी भाज्यांची आवक वाढलेली दिसते ठिकाणी नाक्यावरती गावठी भाज्या घेऊन बसलेले लोक दिसतात ही लोकं बाजूच्या खेडेगावातून सकाळच्या प्रहरी विक्रीसाठी रत्नागिरी शहरांमध्ये दाखल होतात दिवसभर आणलेली भाजीविक्री करून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला लागतात पावसाळ्यामध्ये या लोकांचे या भाज्यांवर तीच उदरनिर्वाह चालू असतो. बाजारपेठेमध्ये काकड्या ,चिबुड भोपळा व अनेक प्रकारच्या पालेभाज्या विक्रीसाठी दिसत आहेत सध्या मुंबईकर व चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी आल्यामुळे या गावठी भाज्या घेण्यासाठी लोकांची खरेदीसाठी गर्दी थोड्या प्रमाणात दिसत आहे पण ज्या प्रमाणात विक्री झाली पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.
www.konkantoday.com