मुंबई विद्यापीठाकडून नव्याने स्थापन होत असलेल्या सिंधुदुर्ग उप परिसराचे आज उदघाटन होणार
मुंबई विद्यापीठाकडून नव्याने स्थापन होत असलेल्या सिंधुदुर्ग उप परिसराचे आज ( दि. १२ ) उदघाटन होणार आहे. सिंधुदुर्ग नगर परिषद यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग उप परिसर या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होत आहे.रविवारी दुपारी ३ वाजता आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भतग सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई विद्यापीठाने सिंधुदुर्ग मधील सावंतवाडी येथे उप परिसराची स्थापना करण्याचे ठरविले आहेब्ल्यू टूरिझम, एग्रो बेस्ड प्रोसेंसिंग युनिट्स, कॉयर अँड बांबून आधारीत इंडस्ट्रीज, फिशरीज, फलोत्पादन, अपारंपरिक कृषी उत्पादने, फूड टेक्नॉलॉजी, फ्रूट प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, वाईनरी टेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात विपूल संधी निर्माण होऊ शकतात. या अशा संशोधन आणि उद्योन्मुख क्षेत्रातील पदवीधरांचा व्यवसाय सुनिनिश्चित करण्याबरोबरच रोजगार आणि उद्योजकता निर्माण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
www.konkantoday.com