
लांज्यातील कै. श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रमात आमदार किरण सामंत यांच्याकडून भाऊबीज कार्यक्रम साजरा
भाऊबीज कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेकांच्या भावनांना बांध फुटला
📍लांजा
📍दि.२३ ऑक्टोबर २०२५
लांजा : लांज्यातील कै. श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रम येथे आज भाऊबीज निमित्त एक भावनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सामंत यांनी महिलाश्रमातील सर्व बहिणींना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत मिठाई वाटप केले आणि त्यांच्या आरोग्य व सुखासाठी आशीर्वाद घेतले. महिलाश्रमातील सर्व महिलांनी आमदार सामंत यांना आपल्या “भावा”प्रमाणे ओवाळणी करून भावनिक वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमादरम्यान आमदार सामंत यांनी महिलाश्रमाच्या गरजा व सुविधा जाणून घेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “या महिला आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. समाजाने त्यांच्याबद्दल मायेने आणि जबाबदारीने विचार करणे गरजेचे आहे.”
लांज्यातील कै. श्रीमती जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रमात आज भाऊबीज निमित्त भावनिक वातावरणात कार्यक्रम पार पडला. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महिलाश्रमातील सर्व बहिणींनी आमदार सामंत यांना आपल्या “भावा”प्रमाणे ओवाळणी केली आमदारांनी सर्वांना मिठाई वाटप करून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आरोग्य व आनंदासाठी आशीर्वाद घेतले.
या भाऊबीज कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेकांच्या भावनांना बांध फुटला. उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि वातावरण भावनिक झाले. आमदार सामंत यांनी महिलाश्रमाच्या सर्व गरजा जाणून घेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी सांगितले की, “या महिला समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्याबद्दल मायेने आणि जबाबदारीने विचार करणे आपले कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाला महिलाश्रमाच्या अध्यक्षा, डॉ. वर्षाताई कांबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंत भाऊ शेटे,माजी नगराध्यक्ष संपदा वाघदरे,विद्याताई बेलवरकर, विजय बेर्डे ,संदीप भिंगारडे, विजय खवळे, संजय तेंडुलकर, भाई कामत, गुरुप्रसाद देसाई, सचिन तेंडुलकर ,मनोहर बाईत, प्रसादभाई शेट्ये ,गणेशशेठ लाखन, मनोज तेंडुलकर, त्याचप्रमाणे सर्व बहिणी कार्यकर्त्या, स्थानिक नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




