दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे शांततेत व उत्साहात विसर्जन

आज घरगुती दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शांततेत व उत्साहात पार पडले रत्नागिरी शहरातील मांडवी किनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी भाविक आले होते घरगुती दीड दिवसाचे गणपतीचे विसर्जन करताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषात बच्चेकंपनी अबालवृद्ध ,तरुण वर्ग मोठ्या संख्येने मांडवी बंदर या समुद्रकिनारी उपस्थित होते. गणपती बाप्पांना निरोप देण्याकरिता नेहमीप्रमाणे कुठल्याही प्रकारचे मिरवणुक किंवा वाद्य वाजंत्री न येता गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडले यावेळी प्रशासनाने नेमून दिलेल्या नियमाचे योग्य पद्धतीने पालन करताना दिसत आहेत घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी आपल्या खाजगी वाहनाने ,रिक्षा असेल किंवा हात गाडीवरती गणपती बाप्पांना घेऊन साधेपणाने येताना दिसत हाेते यावेळी मांडवी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेत‍ा
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button