
आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक बंद असल्याने वाहतूकदारांना नुकसान, वाहतूक सुरू करा, मोटार मालक असोसिएशनची मंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत यांच्याकडे मागणी
काही दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या त्यानंतर हा घाट काही दिवस बंद ठेवून या मार्गावरून आता छोट्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतूक बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक अणुस्कुरा घाटातून सुरू आहे. दिवसाला सुमारे १०० अवजड गाड्यांची वाहतूक अणुस्कुरा घाटातून होते. यामध्ये डिझेल खर्च वाढला असुन वाहतूक व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. तरी अवजड वाहनांसाठी तात्काळ आंबा घाट सुरू करावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनने मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा मोटार मालक असोसिएशनतर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी फिनोलेक्स, अल्ट्राटेक, जिंदल कंपनीमधून माल वाहतूक केली जाते साधारण दिवसाला १०० गाड्यांची वाहतूक या मार्गावरून होते. आंबा घाट बंद असल्याने कोल्हापूरमार्गे जाणारी वाहतूक अणुस्कुरा घाटातून करावी लागत आहे. किलोमीटर वाढत असून गाडीच्या डिझेल खर्चात मोठी वाढ झाली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेवून आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी असोसिएशनने निवेदनाद्वारे केली आहे. तसे निवेदन मंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांना दिले. www.konkantoday.com