लोटेतील वारकरी गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

खेड : तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता तसेच पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ती मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडीतेने गुरुकुलातीलच एका सदस्याला घटना सांगितली असतं त्याने याबाबत कुठे काही बोलू नकोस महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास सांगत धमकावले. तसेच जर कोणाला काही सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या प्रकारच्या घटना घडू लागल्या आणि अखेर हा सर्व प्रकार किती तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला. कुटुंबीयांनी नंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली व या संदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरुन पोलीसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकाराने समाजात आणि धार्मिक संस्थांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली असून अनेक स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी आरोपीची गंभीर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. 
घटनास्थळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सणस व पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी भेट देऊन पहाणी केली.

खेड पोलिसांनी तत्पर कारवाई करून संशयित आरोपी भगवान कोकरे व प्रितेश कदम याना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button