
राज्यातील ३५ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये एक ते दोन टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण
राज्यातील ३५ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये एक ते दोन टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. मुंबई आणि पुणे वगळता एकाही जिल्ह्यातील लसीकरणाच्या टक्केवारीचा आकडा दोन अंकांमध्ये नसल्याची माहिती पुढे आली आहे.महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. ही लस कोणत्या जिल्ह्यातील किती जणांनी लस घेतली, याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. यात एक डोस आणि दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचा समावेश आहे.राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांमधील लसीकरणाची टक्केवारी दोन अंकांमध्ये आहे. मुंबईमध्ये १४ आणि पुण्यात ११ टक्के जणांनी लस घेतली. त्या खालोखाल ठाण्यामध्ये लशीची टक्केवारी ८ असून, पाच टक्के नागपूरकरांनी आतापर्यंत लस घेतली आहे. उर्वरित एक आणि दोन टक्के लसीकरण झालेले २५ जिल्हे आहेत. तर, तीन आणि चार टक्के लसीकरणाचे सहा जिल्हे आहेत.
www.konkantoday.com