गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांचे शहरात जमावबंदीचे आदेश लागू
करोना रुग्ण संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास पोलिसांनी मनाई के ली असून १० ते १९ सप्टेंबर या कालावधीत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.मुंबई पोलिसांनी गुरुवारी परिपत्रक काढून शहरात जमावबंदीचे १४४ कलम लागू केले. या कालावधीत शहरात मिरवणुकी काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत, असे आदेश पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी दिले आहेत.
www.konkantoday.com