बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला मातृशोक,अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे उपचारादरम्यान निधन
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला मातृशोक झाला आहे. अक्षयकुमारच्या आई अरुणा भाटिया यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला. मात्र अवघ्या दोनच दिवसात ही दुःखद बातमी आली.
इन्स्टाग्रामवर अक्षय कुमारची भावूक पोस्ट
ती माझं सर्वस्व होती आणि आज मला असह्य दुःख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली. मी आणि माझे कुटुंब कठीण काळात असताना तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती, अशा शब्दात अक्षयने आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन दिली आहे.
www.konkantoday.com