निवळी जयगड हायवेवर खड्यांचे साम्राज्ज! खंडाळामधील खड्डा मुंबई कर चाकरमान्यांचे करतोय स्वागत
रत्नागिरी – निवळी जयगड मार्गावरील खंडाळा तिठा आजूबाजूच्या २० ते २५ गावांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे येथून सतत रहदारी चालू असते. खंडाळा नाक्यातच मोठे खड्डे झाले आहेत. खंडाळा नाक्यातील खड्डा जणू आपल्या मुंबई करांचे स्वागत करण्यास तयार आहे असे वाटत आहे . ह्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिथे अनेक अपघात झाले आहेत. अपघात होऊ नयेत ह्यासाठी वाटद गावचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे, माध्यमिक विद्यालय वरवडे शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शत्रुघ्न लंबे आणि तेथील भाजीविक्रेते येलये यांनी खड्डे बुजवण्याचे काम केले.तसेच खंडाळा ते जयगड हा रस्ता तर अपघातग्रस्त भाग ठरत आहे गेल्या वर्षी बरेच अपघात झाले.त्यात एका पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तरी शासन व त्या विभागातील नेते लक्ष देत नाही . स्थानिक लोकप्रतिनिधी ना.जनतेचे दुखणे कळत नाही का असा प्रश्न तेथील ग्रामस्थ विचारत आहेत .कंपनीच्या अवजड वाहनांची वाहातूक सुरू आहे .संबंधित खाते या कडे दुर्लक्ष करीत आहे असे या विभागातील जनतेचे म्हटले आहे.गणपतीसाठी मुंबई कर चाकरमनी येण्यास सुरवात झाली आहे. म्हणून वाटद खंडाळा गणातील जनतेची अशी मागणी आहे की लवकर रस्त्या वरील खड्डे भरावे व कंपनीची अवजड वहातूक बंद करावी.
www.konkantoday.com