चाकरमान्यांच्या सुरक्षिततेसाठी मदतीला असलेले पोलिसच बांधव काढताहेत ओल्या झालेल्या तंबूत रात्र ,बांधकाम खात्याच्या कारभाराचा फटका
मुंबई-गोवा महामार्गावर गणेश भक्तांच्या मदतीसाठी पेंडॉल उभारण्यात आले आहेत. मात्र याठिकाणी पेंडॉल उभारताना पीडब्ल्यूडीने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे पोलीस, शिक्षक, आरोग्य व महसूल कर्मचाऱ्यांना आता रात्र ओल्या झालेल्या तंबूत काढावी लागत आहे.
कोविड-19 च्या काळात गेले दीड वर्ष पोलीस, आरोग्य सेवक, शिक्षक, महसूल कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सुरक्षा देत आहेत. मात्र या योध्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी, संगमेश्वर, आरवली या ठिकाणी प्रशासनाकडून पेंडॉल उभारले आहेत. मात्र हे पेंडॉल उभारताना पीडब्लूडीने पेंडॉलमध्ये पाणी जाऊ नये यासाठी खडी, डबर व उंची न वाढवल्यामुळे पेंडॉलमध्य पाणी साचले आहे.तसेच काही प्रमाणात माती ही आली आहे
आरवली येथील पेंडॉल तर चक्क चिखलातच मारण्यात आला आहे. पीडब्ल्युडीने हे पेंडॉल उभारताना जरा सुद्धा पोलीस व इतर कर्मचाऱ्यांची काळजी घेतली नसल्यामुळे रात्रभर या चिखलात उभे रहावे लागणार असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत आरोग्य सेवक, शिक्षक, महसूल कर्मचारी यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
ही परिस्थिती संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर झावरे यांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली.
बांधकाम खात्याने याबाबत दखल घेऊन तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com