
अनेक दिवस बंद असलेली महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील वाहतूक आजपासून छोट्या वाहनांसाठी सुरु ,ट्रक, एस.टी बस सारख्या अवजड वाहनांना तूर्तास तरी प्रतीक्षाच
अनेक दिवसांपासून बंद असलेला कोकणाला जोडणारा वाई-महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील वाहतूक आजपासून छोट्या वाहनांसाठी सुरु झाली. या मार्गाचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याने मालट्रक, एसटी बस, लक्झरी आणि अवजड वाहनांना तूर्तास बंदी या मार्गावर बंदी असणार आहेमहाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटरस्त्याची दुर्दशा झाल्याने वाई महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील वाहतूक बंद झाली होती. किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्कही तुटला होता. तसेच याबरोबरच हाच घाटरस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळणवळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. आज या घाटरस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र ट्रक, एस.टी बस सारख्या अवजड वाहनांना तूर्तास तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
www.konkantoday.com