
संततधार कोसळणार्या मुसळधार पावसामुळे चांदेराई-हरचिरी भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली
गेले दोन दिवस पडणार्या मुसळधार पावसामुळे चांदेराई-हरचिरी भागातही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून हळुहळू पाणी भरत असल्याने व्यापार्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या गणपतीचा सण तोंडावर आल्याने दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर माल भरला आहे परंतु कालपासून संततधार पडत असणार्या पावसामुळे पाणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चांदेराई भागात गणपतीचे कारखाने आहेत. त्यातील मुर्त्या जवळजवळ पूर्णपणे तयार आहेत. असे असताना सध्या कोसळणार्या पावसामुळे ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेला व्यापारी वर्ग आता कुठे सावरत असताना पावसाच्या या नव्या संकटामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.
www.konkantoday.com