राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्यात येणार
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसावर आलेला असतानाच राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणाच नितीन राऊत यांनी केली आहे.त्यामुळे राज्यातील गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील. सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली.
www.konkantoday.com