रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस आक्रमक ,रस्त्यावरच बैठक मारून केले आंदोलन
रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांची दुरावस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे
अनेक भागात खड्ड्यातून रस्ते शोधण्याची वेळ येत आहे विहार वैभव हॉटेल एसटी स्टॅन्ड व अन्य भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे यामुळे वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मात्र नगरपरिषदेकडून थातूरमातूर उपाय केले जात आहेत याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही नगरपरिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जर रस्त्याची दुरूस्ती झाली नाही तर आंदोलनाचा चार दिवसांपूर्वी इशारा दिला होता परंतु सध्या रत्नागिरीच्या रस्त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने आज रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात
महीला प्रदेश सरचिटणीस रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्षा अॅडव्होकेट अश्विनी आगाशे, रत्नागिरी तालुका महिला जिल्हाध्यक्षा रीजवाना शेख, प्रदेश सचिव सुष्मिता सुर्वे, गौतमी,व कपील नागवेकर आधी जण सहभागी झाले होते जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने केलेले आंदोलन म्हणजे संपूर्ण रत्नागिरीच्या भावना असल्याचे मत जनतेकडून वक्त होत होते आता तरी नगरपरिषदेचे सत्ताधारी याकडे गांभीर्याने पाहणार की नाही हा प्रश्न आहे
www.konkantoday.com