दापोली शहरात कधी नव्हे ते आंबेडकर चौकात पाणी भरले ३३६ मि. मि. पावसाची नोंद
कोकणाचे मिनी महाबाळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्या व समुद्रसपाटीपासून बरेच उंचावर असलेल्या दापोली शहरातही दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. दापोली शहरात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ३३६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. काल संपूर्ण शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दुपारनंतर पावसाने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे दापोली शहर परिसरातील केळसकर नाका आदी परिसरात पाणी भरले होते. याशिवाय दापोली शहरातील रूपनगर, नागरबुडी, दापोली, हर्णै आदी मार्गावरही पर्याचे पाणी आले होते. दापोली शहरातील काही नागरी वस्त्यांत पाणी भरले होते.
जालगांव येथील विद्यानगर परिसरात १० ते १५ घरांमध्ये तब्बल दोन फूट पाणी होते. १९७५ साली दापोली शहरात बाजारपेठ पुलावरून पाणी आले होते. त्याची आठवण दापोलीकरांना आली. मात्र रात्रौ उशीरा पावसाचा जोर ओसरल्यानंतर दापोलीकरांनी निश्वास सोडला.
www.konkantoday.com