गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शक सूचना
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असलेल्या नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे.मात्र ज्या नागरिकांच्या कोव्हिड लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत अशा नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा RTPCR चाचणीचा अहवाल नसल्यास अशा प्रवाशांची मोफत Rapid Antigen Test (RAT) तपासणी जिल्ह्याच्या सीमेवर किंवा रेल्वे स्टेशनला केली जाईल. 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांचे प्रवेशास RTPCR चाचणी अहवाल आवश्यक नाही अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
www.konkantoday.com