खेड नगरपालिका दवाखान्यात साकारतोय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

खेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत खेड नगरपालिका दवाखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे.
कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. हे वेळ पुन्हा येऊ नये यासाठी खेड नगरपालिका रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर येथील नगरपालिका दवाखान्यात कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान हे कोविड सेंटर रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरले होते. तालुक्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण या किओवीड सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनमुक्त झाले होते.
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाही या कोवडी सेंटरमध्ये काही कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे हे कोविड सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे ठरत आले आहे. सद्य स्थितीत कोरोनाची तीव्रता कमी झाली असलती तरी लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट आलीच तर तिचा सामना करण्यासाठी खेड नागरप्रशासनाने आतापासून कंबर कसायला सुरवात केली आहे.
तिसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी पूर्वतयारी म्हणून नगरपालिका कोविड सेंटर येथेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. खेडचे सुपुत्र आणि मुंबईस्थित उद्योजक कौस्तुभ बुटाला यांचे या कमी मोठे सहकार्य लाभले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button