अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो -पंकजा मुंडे यांच्या ट्वीटने खळबळ

करुणा शर्मा- मुंडे प्रकरण आणि दोन दिवस घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राज्यात खळबळ उडाली. या साऱ्या प्रकरणावर विरोधकही गप्प असताना पंकजा मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता, ‘अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये, wrong presidents hould not be set! ही काळाची गरज आहे, परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !!’ असे म्हणत ट्विट केले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून शासन, प्राशन आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या ट्विटने मोठी खळबळ उडाली आहे.
करूणा शर्मा यांनी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचे पुरावे देणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्या परळीत पत्रकार परिषद घेण्यासाठी आल्या, मात्र पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्या गाडीत पिस्तूल सापडले. या दरम्यान गाडीत काहीतरी ठेवले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर ॲट्रॉसिटी, चाकूहल्ला हे गुन्हेही दाखल झाले आहेत
www.konksntoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button