
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त होणार प्रशासनाने आखली मोहीम
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त होणार असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी खास मोहीम आखली आहे
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांचा उपद्रव थांबवण्यासाठी त्यांना पकडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे येत्या रविवारपासून त्याला सुरुवात होणार आहे.शहरात ३०० मोकाट गुरे असून, त्यापैकी २० जनावरांना लम्पी झाला आहे. त्यांना पकडण्यासाठी पाच-पाचचे गट तयार केले आहेत. पकडलेली गुरे चंपक मैदानावर शेडमध्ये ठेवली जाणार आहेत. गुरांच्या मालकांनी दोन दिवसात न्यावीत अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सर्वांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी बैठक घेऊन मोकाट गुरांना पकडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर उपस्थित होते. पशुवैद्यकीय अधिकारी, गुरे पकडणाऱ्या काही संस्थादेखील आल्या होत्या. शहरात सुमारे ३०० मोकाट गुरे आहेत. त्यापैकी २० जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. या जनावरांना पकडण्यासाठी पाच-पाच गट तयार केल्या आहेत. एका टीममध्ये १० सदस्य असणार आहेत. त्यांना पकडून चंपक मैदानातील एक एकर जागेमध्ये बंदिस्त शेडमध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्यांच्या चाऱ्याची, पाण्याची आणि वैद्यकीय तपासणी पालिका आणि प्रशासनाकडून केली जाणार आहे. आता ही मोहीम सुरू होणार आहे. त्यापूर्वी गुरांच्या मालकांनी ही गुरे न्यावीत अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Www.konkantoday.com