मुंबई-गोवा महामार्गासाठी संगमेश्वरवासी रस्त्यावरतीघोषणानी संगमेश्वर दणालले..

समृद्ध कोकण संघटना आणि कोकण महामार्ग समन्वय समितीच्या वतीने आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडललेल्या कामासाठी, खड्डेमय रस्त्याच्या विरोधात आज दि. ६ सप्टेंबर रोजी मानवी साखळी जनआंदोलन संगमेश्वर येथे पार पडले.

जनतेच्या न्याय हक्कासाठी हें आंदोलन छेडण्यात आले होते. कोकण हायवे साठी अनेक सामान्य लोक रस्त्यावर आलेली पाहायला मिळाली.यावेळी आंदोलकाच्या घोषणानी संगमेश्वर दनाणले होते.
समृद्ध कोकण संघटना आणि कोकण महामार्ग समन्वय समितीचे प्रमुख संजय यादवराव व राज्याचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर,ऍड. ओवेस पेचकर
यांच्या मार्गदर्शना खाली संगमेश्वर येथे युयुत्सु आर्ते, रमजान गोलंदाज, विवेक शेरे, अमोल लोध यांनी आंदोलनाची मूठ बांधली होती. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामाच्या दिरंगाईमुळे कोकणवासीयांचा, प्रवाशांच्या सहनशीलतेचा बांध आता फुटला आहे. कोकणच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग बनणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार असून सर्वांचा प्रवास सुखकर, सुरक्षित होण्यास मदत होईल. आंदोलनातील प्रमुख मागण्या अशा – जाहीर केल्याप्रमाणे पुढील एक वर्षात दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग पूर्ण व्हावा. शाळा, गावे अशा ठिकाणी अंडरपासची सोय करावी. अपघातासाठी कारणीभूत असणारी धोकादायक वळणे, घाट शक्य तितके सोपे करावेत. जेएनपीटी, दिघी, औद्योगिक पट्टा असणाऱ्या पनवेल ते माणगाव या रस्त्याला सहापदरी करत संपूर्ण सिमेंट रस्ता बनवावा, संपूर्ण सर्व्हिस रोड असावा. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारू नये. डोंगर पोखरण्याऐवजी भरावासाठी नदीतील गाळ महामार्गाच्या कामासाठी वापरावा. महामार्गावर विविध झाडे लावत देशातील सुंदर ग्रीन हायवे बनवावा. दर २५ किलोमीटरवर शेतकरी बाजाराची सुविधा करावी.अश्या अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनाला चांगला रिस्पॉन्स मिळाला असून परिसरातील लोकांनी, व्यापारांनी, अनेक संघटनानी पाठिंबा जाहीर केला होता
या आंदोलनात संघटनेचे प्रमुख संजय यादवराव, संगमेश्वरचे आयोजक रमजान गोलंदाज, युयूत्सु आर्ते, विवेक शेरे, मकरंद गांधी, अमोल लोध, जमूरत अलजी, रिंकू कोळवणकर, राजेंद्र पोमेंडकर, हरीभाई पटेल, जितेंद्र चव्हाण, तैमूर अलजी, गुलाम पारेख, अंनत पाताडे, दिनेश नींगावले, विनायक खातू, शादाब बोट, दिलदार कापडी, खातू सर, धनाजी भांगे, पपू सप्रे आदी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button