गुहागर साखरीआगरी येथे विहिरीत बिबट्या पडला,वन विभागाने सुरक्षित बाहेर काढले

गुहागर साखरीआगरी येथे विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली या बिबट्याला ,वन विभागाने सुरक्षित बाहेर काढले
शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या गुहागर तालुक्यातील साखरी आगर गावातील भरवस्तीत असलेल्या विहिरीमध्ये पडला या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी आले
साखरी आगर येथील नंदकुमार नारायण झगडे यांच्या घराच्या मागे विहिर आहे. तसेच लगत जंगल परिसर असून सोमवारी सकाळी या विहिरीतील पाण्याचा पंप सुरू होत नसल्याने घरातील काहीजण सदरील पंप पाहण्यासाठी विहिरीवर आले होते. विहिरीत त्यांना डरकाळीचा आवाज आल्याने विहिरीत पाहिले असता विहिरीतील एका खडकाच्या भागांमध्ये भलामोठा बिबट्या बसल्याचे दिसून आले. बिबट्याला पाहताच आलेले भयभीत झाले. दरम्यान,ता.गुहागर येथे श्री. नंदकुमार झगडे यांना त्यांचे विहिरीत बिबटया पडलेल्या दिसून आला.त्यानंतर त्यांनी श्री. परशेटये, वनपाल गुहागर यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून
याबाबत माहिती दिली. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री. खाडे साहेब,सहाय्यक वनसंरक्षक श्री.निलख साहेब यांचे मार्गदर्शना खाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती
किर मॅडम, वनपाल गुहागर श्री. परशेटये, वनरक्षक रानवी श्री.मांडवकर, वनरक्षक अडूर
श्री. दुंडगे, वनरक्षक आबलोली श्री.सावर्डेकर यांनी विहिरीत पडलेल्या बिबटयास पिंज-यातरेस्क्यू करून सुस्थितीत ताब्यात घेतले. सदर ठिकाणी गुहागर पोलिस कॉन्स्टेबल श्री.कदम, पोलिस पाटील साखरीआगर, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. सदरच्या नर
जातीचा बिबटया अंदाजे साधारणपणे दीड वर्षे वयाचा होता
दुपारी तीन वाजेपर्यंत बिबट्याला विहिरीतून काढण्यात यश आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button