
खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना
मुसळधार पावसामुळे रविवारी खेड तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. खेडच्या जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्याने खेड शहरात पाणी शिरले. शेकडो हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली.अशात खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यांदेखत हा तरुण वाहत चालला होता. मात्र, पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काही चाललं नाही. या घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेरत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला असून त्याची शोध मोहीम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व महत्त्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून जयेश रामचंद्र आंब्रे हा 32 वर्षाचा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्याची शोधमोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे.